नंदुरबार: ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयात दि.16/03/24 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण , ग्रामपुष्प नियतकालिकाचे प्रकाशन आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. पी.बी पटेल होते.तर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी मा. डॉ. के.एच. चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर ग्रामपुष्प नियतकालिकाचे प्रकाशन संस्थेचे सचिव मा.बी.व्ही.चौधरी यांच्या शुभहस्ते झाले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.पी.बी.पटेल यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कामांचे कौतुक केले. ध्येय निश्चिती केली तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कास कशी धरावी आणि जीवनात येणाऱ्या विविध आव्हानांना कसे सामोरे जावे याबद्दल विविध उदा. दिली. तसेच ग्रामपुष्प प्रकाशन समारंभाच्या वेळी संस्थेचे सचिव मा.बी.व्ही. चौधरी यांनी सतराव्या नियतकालिक अंकाचे प्रकाशन करत असताना संस्थेच्या इतिहासावर प्रकाश टाकला पहिल्या अंकापासून ते आज पर्यंतच्या अंकात कसे कसे बदल होत गेलेत त्या सर्वांचा लेखाजोखा सादर केला. उत्तरोत्तर होत असलेली प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. अंकात लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एन.गिरासे यांनी ही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी न होता ज्ञानार्जन करून यश संपादन करावे. सध्याचे युगे स्पर्धेचे युग असल्याकारणाने विद्यार्थ्यांनी जी स्वप्न पाहिलेली आहेत ती प्रत्यक्षात सत्यात उतरविल्याशिवाय यश मिळणार नाही असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागातील प्रा. एस. एस. दुथडे यांनी केले. तर प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख आणि ग्रामपुष्पाचे संपादक डॉ.सी.एस. करंके यांनी केले तर आभार प्रकटन क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी. जे. पटेल यांनी केले.
दुपारी दोन वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एम. एस. निकुंबे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. सुरुवातीला प्रभारी प्राचार्य डॉ.बी एन गिरासे यांच्या शुभहस्ते नटेश्वराचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यात विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी रीमिक्स गाणी, आदिवासी गाणी, हिंदी आणि मराठी गाणी तसेच लघु नाटिका शेतकरी आत्महत्या इत्यादी ज्वलंत विषयावर कार्यक्रम सादर केले .अशाप्रकारे स्नेहसंमेलनाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.