9.1 C
New York
Thursday, Nov 21, 2024
Bharat Mirror Marathi
व्यापार-उद्योग

क्रेडेबल (CredAble)द्वारे व्यवसाय वाढीचे अॅप, अपस्केल (UpScale)चा शुभारंभ

मुंबई, भारत, 20 डिसेंबर, 2022: डिजिटल परिवर्तनावर भारत सरकारच्या उत्साही भूमिकेला अनुसरून, व्यवसाय वाढीचे एक अॅप, क्रेडेबल (CredAble)च्या अपस्केल (UpScale)ने, लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगां (SMEs)साठी एक नवीन ई-इनव्हॉइसिंग सोल्युशनचा शुभारंभ केला आहे. हे सोल्युशन, भारत सरकारच्या नेतृत्वाखालील नियमांनुसार, आर्थिक ऑपरेशन्स व्यवस्थापन सहाय्य प्राप्त असलेल्या व्यवसायांना मदत करते. अलीकडील सरकारी निर्देशानुसार, 1 जानेवारी, 2023 पासून, काही व्यवसायांसाठी ई-इनव्हॉईसिंग अनिवार्य असेल. यामध्ये, 2017-18 ते 2021-22 पर्यंत कोणत्याही मागील आर्थिक वर्षात, रु. 5 कोटी आणि त्याहून अधिक जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांचा समावेश आहे.

ई-इनव्हॉइसिंगसह, संस्था, त्यांच्या इनव्हॉइस प्रक्रिया चक्राचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतील, ज्यामुळे इनव्हॉइस प्रक्रिया, मान्यता, ट्रॅकिंग आणि इन्व्हॉइस आणि मानवी त्रुटींचा पाठलाग करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणखी कमी होईल, त्यामुळे अधिक जलद टर्नअराउंड टाईम मिळेल. येत्या काही महिन्यांत, मोठ्या संख्येने लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगां (SMEs)ना, एक जटिल नसलेले आणि परवडणारे दोन्ही प्रकारचे सोल्युशन शोधण्यात आव्हानांचा सामना करावा लागेल अशी अपेक्षा आहे. येथेच क्रेडेबल (CredAble)चे अपस्केल (UpScale) मदतीस धावून येते.

भारतातील सर्वात मोठे खेळते भांडवल तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म असलेल्या क्रेडेबल (CredAble)द्वारे, नोव्हेंबर 2021 मध्ये लाँच केलेले, अपस्केल (UpScale) हे, लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगां (SMEs)ना खेळते भांडवल, व्यापार सहाय्य आणि संधी, तसेच इन्व्हॉइसिंग व्यवस्थापन यासह परवडणारे पेमेंट सोल्यूशन प्रदान करते.

जानेवारी 2023 पासून, वार्षिक 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी सरकारकडून ई-इनव्हॉइसिंग आवश्यक असेल. सध्या, फक्त 10 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी ते आवश्यक आहे. यामुळे लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योग (SMEs) एक सोपे आणि स्वस्त सोल्युशन शोधत आहेत.नवीन डिजिटल इकोसिस्टममध्ये, लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगां (SMEs)ना सामना करावा लागणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, क्रेडेबल (CredAble)चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO),  नीरव चोक्सी म्हणाले, “क्रेडएबल (CredAble), सातत्याने सर्वात अलीकडील तंत्रज्ञान मानकांचा वेगाने अवलंब करण्यात अग्रेसर आहे आणि त्याने, कार्यक्षमतेने काम करू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी एक महत्वाचे सोल्युशन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

आमचा विश्वास आहे की, अपस्केल (UpScale)चे ई-इनव्हॉइसिंग सोल्यूशन ही एक गरज आहे आणि ते, विशेषतः लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगां (SMEs)ना लक्षात घेऊन निर्माण करण्यात आले आहे. हे, त्यांना सरकारी नियमांचे पालन करण्यात मदत करण्यासाठी, अगदी कमी किमतीत, शक्य तितक्या सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने एक अद्वितीय सोल्युशन प्रदान करते. आम्हाला आनंद आहे की, व्यवसाय परिसंस्थेतील आमच्या संपर्कामुळे आणि कौशल्यामुळे आम्हाला भारतीय लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगां (SMEs)ची आव्हाने समजून घेण्यात मदत झाली, ज्यामुळे आम्हाला अखेरीस अपस्केल (UpScale) निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळाली. क्रेडिट आणि कॅश फ्लो व्यवस्थापनाच्या दरम्यानचे अंतर भरून काढण्याव्यतिरिक्त, हे ऍप्लिकेशन, अशा डिजिटल परिवर्तन चळवळीला सक्रियपणे योगदान देते, जी, सध्या पुढील दहा वर्षांना, लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगां (SMEs)साठी आकार देत आहे.”

या नवीन सोल्यूशनसह, एक अपस्केल (UpScale) वापरकर्ता/वापरकर्ती, सर्व लागू वस्तू आणि सेवा कर ओळख क्रमांकां (GSTINs)साठी, फक्त दोन प्रकारे ई-इनव्हॉइस तयार करू शकतो/शकते –

1. अपस्केल (UpScale)वर तयार केलेल्या इनव्हॉइससाठी इनव्हॉइस संदर्भ क्रमांक (IRN) निर्माण करणे
आणि

2. एक एक्सेल फाइल अपलोड करून, मोठ्या प्रमाणात इनव्हॉइस संदर्भ क्रमांक (IRNs) निर्माण करणे

ई-इनव्हॉइसिंगसाठी अपस्केल (UpScale) वापरण्याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत:

• मोठ्या प्रमाणात इनव्हॉइस संदर्भ क्रमांक (IRN) निर्माण करणे: अपस्केल (UpScale)चा वापर करून तुम्ही सरकार-आदेशित फील्ड्स वापरून, मोठ्या प्रमाणात ई-इनव्हॉइस निर्माण करू शकता.

• एका क्लिकवर इनव्हॉइस पाठवणे – तुम्ही अपस्केल (UpScale)वर इनव्हॉइसे निर्माण करू शकता आणि त्यांना एका क्लिकवर ई-इनव्हॉइसिंग पोर्टलवर पाठवू शकता.

• रिअल-टाइम डेटा बॅकअप – स्वयंचलित क्लाउड स्टोरेज, तुम्हाला भविष्यात कधीही सुलभ आणि सुरक्षित पुनर्प्राप्तीसाठी तुमचे सर्व ई-इनव्हॉइस संचयित करण्यात मदत करते. स्वाक्षरीकृत क्विक रिस्पॉन्स (QR)सह तुमचे मागील सर्व ई-इनव्हॉइस पुनर्प्राप्त करा.

• स्मार्ट एरर व्हॅलिडेशन्स – उल्लंघने, चुकीची डेटा एंट्री आणि गहाळ अनिवार्य फील्ड ओळखण्यासाठी अपस्केल (UpScale), तुमचा डेटा अगोदरच प्रमाणित करते.• व्हॉट्सअॅप (WhatsApp), ईमेल आणि एसएमएस (SMS)द्वारे शेअर करा – एका क्लिकवर कम्युनिकेशन. तुमच्या सर्व ग्राहकांना एका क्लिकवर ईमेल, एसएमएस (SMS) आणि

• एकाधिक वस्तू आणि सेवा कर ओळख क्रमांक (GSTIN) सहाय्य – अपस्केल (UpScale)चे ई-इनव्हॉइसिंग सोल्यूशन वापरून तुम्ही तुमच्या सर्व वस्तू आणि सेवा कर ओळख क्रमांकां (GSTINs)साठी एकाच वेळी ई-इनव्हॉइस पाठवू शकता.

क्रेडएबल (CredAble) येथील (UpScale)चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य खरेदी अधिकारी (CPO), श्री. नितीन शर्मा म्हणाले, “भारत व्यवसाय व्यवस्थापित करण्याच्या आणि वाढवण्याच्या नवीन युगात प्रवेश करत असताना, करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही बाब देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, आमच्या ई-इनव्हॉइसिंग सोल्यूशनसह, व्यवसायांना आता अपस्केल (UpScale)च्या देय आणि प्राप्त करण्यायोग्य सोल्यूशनमध्ये देखील विनामूल्य प्रवेश आहे.

अपस्केल (UpScale)द्वारे, लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगां (SMEs)ना, बिलिंग आणि इनव्हॉइसिंग व्यवस्थापन, पेमेंट सोल्यूशन्स आणि व्यवसाय क्रेडिटमध्ये सहज प्रवेश या बाबींमध्ये मदत केली जाते. आणि आता, व्यवसायांना इनव्हॉइस संदर्भ क्रमांक मिळविण्यासाठी, ई-इनव्हॉइसिंग (UpScale)चे ई-इनव्हॉइसिंग सोल्यूशन, त्यांना हे सर्व सहज आणि अचूकपणे करण्यास मदत करेल.

ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे की, क्रेडेबल (CredAble)चे अपस्केल (UpScale) हे, एक असे एकमेव व्यवसाय अॅप्लिकेशन आहे, ज्यामध्ये 30 पेक्षा जास्त बँकिंग भागीदारी आहेत, हे लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगा (SMEs)च्या मालकांना विविध स्वरूपात, म्हणजे, सुरक्षित आणि असुरक्षित दोन्ही व्यवसाय मुदत कर्जे, इनव्हॉइस सवलत, बाय नाऊ पे लेटर प्रोग्राम इ. स्वरूपात, कार्यरत भांडवलामध्ये प्राप्त करण्यात मदत करते. अपस्केल (UpScale)च्या प्रोप्रायटरी तंत्रज्ञानाचा वापर करून 250,000 हून अधिक संभाव्य व्यवसायांचे आधीच मूल्यांकन केले गेले आहे. यामध्ये कर्जदार, सावकार (लेंडर) आणि कर्ज देणारी उत्पादने यांच्यातील सर्वोत्तम जुळणी शोधण्यासाठी 700हून अधिक सावकारां (लेंडर्स)कडून क्रेडिट सुविधा, 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बँक व्यवहार आणि 10,000 कोटी किंवा त्याहून अधिक किमतीच्या दहा लाखांहून अधिक इनव्हॉइसचे विश्लेषण केले गेले आहे.

अपस्केल (UpScale)कडे शक्तिशाली सोल्युशन्स देखील आहेत, जसे की द्रुत विक्रेता पडताळणीसाठी वस्तू आणि सेवा कर (GST) सुपर सर्च साधन, स्वयंचलित पेमेंट स्मरणपत्रे, ऑनलाइन संकलन आणि सामंजस्य, विक्रेता व्यवस्थापन आणि बरेच काही यासारखे बिझिनेस टू बिझिनेस (B2B) पेमेंट सोल्युशन्स.शिवाय, क्रेडेबल (CredAble)च्या अपस्केल (UpScale)चा उद्देश हा, अशा लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगां (SMEs)ना मदत करणे हा आहे, जे एकतर त्यांचे इनव्हॉइस एक्सेलमध्ये तयार करतात किंवा ई-इनव्हॉइसिंगशी सुसंगत नसलेले ईआरपी (ERP) वापरतात.आहे. इतर ऍप्लिकेशन्सच्या विपरीत, अपस्केल (UpScale)द्वारे, लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगा (SMEs)साठी, सर्वांगीण वाढीच्या प्रमुख संकेतकावर लक्ष ठेवले जाते. खेळत्या भांडवलात सुलभ प्रवेश आणि आर्थिक माहिती आणि ऑपरेशन्सचा सुरळीत प्रवाह यासह, अपस्केल (UpScale), लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योग(SME) वाढीसाठी सर्वात विश्वासार्ह तंत्रज्ञान अॅप्लिकेशन बनण्यासाठी सज्ज आहे.

 

Related posts

मुंबईची असीमित ऊर्जा, सर्वसमावेशकता आणि एकता जपण्याच्यादृष्टीने मुंबई फेस्टिव्हल 2024 साठी ‘प्रत्येक जण आमंत्रित’

BM Marathi

जेके टायरने केले महाराष्ट्रात आपले रिटेल अस्तित्व आणखी मजबूत

BM Marathi

वॉशिंग्टनसह अमेरिकेतील हॉटेल्समध्ये उत्पादने आणि सेवांना मोठी मागणी

BM Marathi

Leave a Comment