Bharat Mirror Marathi
सुरत

सुरत : ‘भारतरत्न’ डॉ. भीमराव आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहिली श्रद्धांजली

बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६ डिसेंबर १९५६ रोजी झाले. संविधान निर्माता डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते. जातिवाद निर्मूलन आणि गरीब, दलित, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. म्हणूनच आज त्यांची पुण्यतिथी देशभरात महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते.

आज 6 डिसेंबर रोजी महामानव विश्वरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सुरत शहरातील रिंगरोड मानदरवाजा येथे असलेल्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यमान माजी नगरसेवक धनसुखभाई राजपूत, सुरत शहर समाज प्रमुख कुणाल भाईदास सोनवणे, समाजाचे नेते उखर्डू धिवरे बापू, दिलीप अहिरे गुरुजी, बोरसे अण्णा, राजेश बापू सूर्यवंशी, नामदेवराव झाल्टे, प्रभाकर नागमल, गोविंद पिंपळीसकर, दिलीप शिरसाठ, विजय मणिभाऊ, अजित पवार, सावंत आदी उपस्थित होते. जाधव मदन धुरंधर, जितेंद्र इंदवे, विनय मंगळे, योगेश ससाणे यांच्यासह मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.

Related posts

माँ काली एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टचे सेवा आणि लोककल्याणाचे कार्य

BM Marathi

सुरतच्या मुलीने 50 किलो देशी मक्यापासून बनवली गणेशमूर्ती

BM Marathi

सुरत जिल्हा सेवा सदनमध्ये चोवीस तास निवडणूक शाखा सुरू

BM Marathi

Leave a Comment