या जुलैमध्ये ‘झी बॉलीवूड’ झाली 101 टक्के शुध्द जल्लोषासाठी सज्ज!
या जुलैमध्ये ‘झी बॉलीवूड’ वाहिनीवर तुमच्यासाठी सादर होत असलेली मनोरंजक चित्रपटांची यादी पाहून तुम्ही खुश
व्हाल! टीव्हीवरील 101 टक्के शुध्द मनोरंजनाचे ठिकाण असलेल्या या वाहिनीवरील चित्रपटांतील मसालेदार संवाद, ढासू
गाणी आणि तुमचे आवडते कलाकारांमुळे पुढील वीकेण्डला तुमच्या मनात विविध जुन्या रम्य आठवणी जाग्या होतील.
29 जुलै च्या वीकेण्डच्या जल्लोषाचा प्रारंभ बॉलीवूडमधील महान अभिनेता संजूबाबा ऊर्फ संजय दत्त याच्या
वाढदिवसानिमित्त त्याच्या चित्रपटांनी केला जाईल. त्याच्या पाठोपाठ 30 जुलै रोजी योग्य प्रमाणातील प्रेमकथा, परंपरा
आणि आदर्शमूल्ये यांच्यातील संघर्ष आणि सामाजिक संदेशाचे अचूक मिलाफ झालेल्या ‘प्रेमरोग’ या चित्रपटाच्या
प्रदर्शनास 40 वर्षे झाल्याबद्दल त्याचे प्रसारण केले जाईल. निवांत रविवारी, 31 जुलै रोजी प्रदर्शनास 35 वर्षे पूर्ण
करणारा धमाकेदार अॅक्शनने भरलेल्या ‘खुदगर्ज’ चित्रपटाचे प्रसारण केले जाईल.
29 जुलै रोजी बॉलीवूडचा 101 टक्के शुध्द मनोरंजन स्टार असलेल्या संजय दत्तचा 63 वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्या
दिवशी या वाहिनीवर दिवसभर संजय दत्तचे जबरदस्त चित्रपट प्रसारित केले जातील. सकाळी 8.45 वाजता संजय दत्त
आणि माधुरी दीक्षित यांच्या भूमिका असलेल्या आणि ‘तम्मा तम्मा’ हे जबरदस्त सुपरहिट गाणे असलेल्या ‘थानेदार’
चित्रपटाचे प्रसारण केले जाईल.
त्यानंतर सकाळी 11.30 वाजता संजूबाबा आणि गोविंदा यांच्यासह करिष्मा कपूर आणि पूजा बात्रा यांच्या धमाल विनोदी कामगिरी ‘हसीना मान जाएगी’ या चित्रपटाचे प्रसारण केले जाईल. पाठोपाठ संजूबाबा-गोविंदा जोडीसह जॅकी श्रॉफ आणि अमृता अरोरा यांच्या भूमिका असलेल्या ‘एक और एक ग्याराह’ चित्रपटाचे दुपारी 2.30 वाजता प्रसारण केले जाईल. शेवटी संध्याकाळी 6.00 वाजता संजय दत्तचा सर्वोच्च धमाकेदार चित्रपट ‘खलनायक’च्या प्रसारणानंतर या विशेष दिनाची सांगता केली जाईल.
“रीत-रीवाज इन्सान की सहुलियत के लिए बनाए जाते हैं, इन्सान रीत-रीवाजों के लिए नहीं…” या सदाबहार संवादांनी
एका सामाजिक संदेश देणार््या चित्रपटाची निर्मिती झाली. दिवंगत ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या
अफलातून कामगिरीसह शम्मी कपूर, कुलभूषण खरबंदा, तनुजा, बिंदू, सुषमा सेठ आणि रझा मुराद यासारख्या दिग्गज
कलाकारांच्याही उत्कृष्ट अभिनयाने ‘प्रेमरोग’ या चित्रपटाची निर्मिती झाली.
निष्ठूर समाज आणि त्याच्या कालबाह्य रूढी- रिवाजांविरोधात दोन प्रेमीजनांनी केलेल्या संघर्षाचे चित्रण असलेल्या ‘प्रेमरोग’ चित्रपटच्या प्रदर्शनास 40 गौरवशाली वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाच्या यशात त्यातील दमदार संवाद आणि राज कपूर यांचे संवेदनशील दिग्दर्शनाबरोबरच त्यातील सुश्राव्य संगीताचाही मोठा वाटा आहे. 30 जुलै रोजी सकाळी 11.00 वाजता या अभिजात
चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल.
जुन्या दिवसांच्या आठवणी जाग्या करताना पद्मिनी कोल्हापुरे म्हणाली, “भारतीय चित्रपटांच्या इतिहासात प्रेमरोग हा
एका युगप्रवर्तक चित्रपट होता. ती केवळ दोन प्रेमी जीवांची कथा नव्हती, तर त्यात तत्कालिन ग्रामीण भारतातील करूण
वस्तुस्थितीचं प्रतिबिंब पडलं होतं. त्यातील माझी मनोरमाची व्यक्तिरेखा ही केवळ रूढींची बळी ठरलेल्या एका गरीब
मुलीची नव्हती, तर ज्या मुली स्वत:च्या इच्छेचा उच्चार करू शकत नव्हत्या, अशांचा मी आवाज बनले होते.
केवळ राजसाहेबच (राज कपूर) असा गोंधळ काव्यमय पध्दतीने पडद्यावर सादर करू शकत होते. माझ्या स्वच्छंदी आणि
बडबड्या स्वभावाच्या व्यक्तिरेखेसमोर आपले आवडते ऋषीजी हे देवधरच्या शांत, संयमी आणि समजुतदार व्यक्तिरेखेत
होते. ती व्यक्तिरेखा त्यांच्यासाठीसुध्दा तशी नावीन्यपूर्णच होती. आज आपण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची 40 वर्षे साजरी
करीत असताना मला आजही त्यातील काही नवे तपशील नव्याने सापडतात. त्यावरून ही किती अभिजात कलाकृती
आहे, ते दिसून येतं.”
दिग्गज कलाकारांचा अभिनय, सुरेल संगीत आणि मन गुंतवून ठेवणारे नाट्यपूर्ण कथानक यामुळे नाट्यमय प्रसंगांचा
आदर्श वस्तुपाठ देणारा ‘खुदगर्ज’ चित्रपट जबरदस्त हिट झाला. तब्बल 35 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे
राकेश रोशन यांना एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळाली. या चित्रपटाच्या पटकथेमुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर
होईल, याची त्यांना खात्री असली, तरी हा चित्रपट खरोखरच हिट झाला, तर आपण आपल्या डोक्यावरील सर्व केस
भादरून टाकू, अशी घोषणा राकेश रोशन यांनी केली होती.
त्यानंतर काय घडले, तो इतिहासच आहे. शत्रुघ्न सिन्हा, जीतेंद्र, अमृता सिंह, गोविंदा, नीलम, कादर खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकांमुळे ‘खुदगर्ज’ एक शानदार चित्रपट बनला. ‘खुदगर्ज’च्या प्रदर्शनास 35 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 31 जुलै रोजी सकाळी 11.00 वाजता त्याचे प्रसारण झी बॉलीवूड वाहिनीवर केले जाईल. येत्या वीकेण्डला 101 टक्के शुध्द मनोरंजनास सिध्द व्हा फक्त ‘झी बॉलीवूड’वर!