शहादा, ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालय बामखेडा त.त.येथे राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांनी फटाके मुक्तीची दिवाळीची घेतली शपथ. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सी.एस.करंके यांनी फटाक्यांपासून कोणकोणते दुष्परिणाम होतात. याची विद्यार्थ्यांना जाणीव आणि जागृती करुन दिली.तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत श्वसनाचे कोणकोणते आजार होतात या विषयी माहिती देताना विविध उदा.देऊन महत्व पटवून दिले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी आम्ही फटाके फोडणार नाही आणि आमच्या परिसरातील वातावरण दूषित करणार नाही .फटाके ऐवजी पुस्तके घेऊ अशी सामूहिक फटाके मुक्ती दिवाळीची शपथ घेतली.त्यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ वाय.सी.गावीत व महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.के.पी.पाटील मॅडम उपस्थित होत्या.
या उपक्रमा बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री पी.बी.पटेल, उपाध्यक्ष मा.श्री के.एच.चौधरी.सचिव मा.श्री.बी.व्ही चौधरी तसेच प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे. या.प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.