क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणतात, या खेळात काय होउल, सांगता येत नाही? या खेळात काहीही अशक्य नाही. क्रिकेटमध्ये अनेक विक्रम होतात आणि मोडले जातात. भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडने सोमवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये असाच पराक्रम केला.
विजय हजारे यांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध महाराष्ट्राच्या डावाच्या 49व्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडने सलग सात षटकार ठोकले. त्याने यूपीचा लेफ्ट आर्म स्पिनर शिवा सिंगच्या चेंडूवर 7 षटकार ठोकले. भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडने या सामन्यात 159 चेंडूत 16 षटकारांसह नाबाद 220 धावांची तुफानी खेळी केली.
6⃣,6⃣,6⃣,6⃣,6⃣nb,6⃣,6⃣
Ruturaj Gaikwad smashes 4⃣3⃣ runs in one over! 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/cIJsS7QVxK…#MAHvUP | #VijayHazareTrophy | #QF2 | @mastercardindia pic.twitter.com/j0CvsWZeES
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 28, 2022
शिवा सिंगच्या पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडने लाँग-ऑनवर षटकार ठोकला. दुसरा षटकार गोलंदाजाच्या डोक्यावर लागला. मिडविकेटवर तिसरा षटकार मारला. लाँग ऑफवर चौथा षटकार मारतो. लाँग ऑफवर पाचवा षटकार मारतो. गायकवाडने सहावा षटकार मिडविकेटवर फ्री हिटवर मारला. 7वा षटकारही मिडविकेटवर मारला होता.