Bharat Mirror Marathi
सुरत

लिंबायत परिसरात स्वातंत्र्यसैनिक व लष्करी जवानांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन

नगर प्राथमिक शिक्षण समिती-सुरत व प्राथमिक शैक्षणिक महासंघ-सुरत कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य संग्रामाच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आज लिंबायत परिसरात स्वातंत्र्यसैनिक व लष्करी जवानांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लिंबायत सुभाषनगर कम्युनिटी हॉल येथे आयोजित कार्यक्रमात लिंबायतच्या आमदार संगीतापाटील, नगर प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष धनेशभाई शाह, शासकीय अधिकारी विमलभाई देसाई व शिक्षण समिती सदस्य व स्थानिक नगरसेवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्रा.शैलेशभाई घीवाला यांनी वक्तव्य दिले.

या कार्यक्रमाला आमदार संगीता पाटील यांनी संबोधित केले. यासह भारत मातेचे पूजन व आरती करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले.

यासोबतच स्वातंत्र्यसैनिक आणि सैन्यात सेवा करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शालेय मुलांनी विविध महापुरुषांची वेशभूषा करून वातावरण देशभक्तीमय बनले होते.

Related posts

सुरत : 4 लाखांचा चेक रिटर्न केल्याप्रकरणी कापड व्यावसायिकाला दोन वर्षांचा कारावास

BM Marathi

सुरतच्या मुलीने 50 किलो देशी मक्यापासून बनवली गणेशमूर्ती

BM Marathi

श्री मराठा पाटील समाज मंडळ सुरत प्रमुखपदी छोटू पाटील यांची निवड

BM Marathi

Leave a Comment