3.5 C
New York
Wednesday, Jan 29, 2025
Bharat Mirror Marathi
धुळे नंदुरबार शिक्षा

बामखेडा महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिर त-हाडी येथे संपन्न

शिरपुर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व ग्रामविकास संस्थेचे कला महाविद्यालय बामखेडे त.त. यांच्या संयुक्त विद्यमाने रासेयो शिबीर त-हाडी येथे दिनांक २८ जानेवारी २३ ते ३ फेब्रुवारी २३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

या सात दिवशीय शिबिरामध्ये संपूर्ण गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच गावांमधील प्लास्टिक कचरा साफ करून त्याची योग्य विल्हेवाट लावली, स्वयंसेवकांनी गावात जाऊन बी.पी. व मधुमेह तपासणी संबंधी घरोघरी जाऊन प्रचार केला.त्यात १०० तपासण्या करण्यात आल्यात.तसेच एक मुठ धान्य संकलन या उपक्रमात चार क्विंटल धान्य संकलन केले त्याच बरोबर माणुसकिची भिंत या उपक्रमातून संपूर्ण गावातून जुने कपडे, साड्या, मोठ्या प्रमाणावर संकलन करण्यात आले.तसच गुरांना पाणी पिण्याची सहा कुंड्यांची साफ सफाई केली.

या सदर शिबिरामध्ये आपत्ती व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मानसिक आरोग्याचे संवर्धन, स्वच्छ भारत अभियान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कोरोना मुक्त भारत, भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव, पर्यावरण व संवर्धन, अन्नपदार्थ सुरक्षा जनजागृती, डिजिटल साक्षरता, अवयव दान, वित्तीय साक्षरता, बेटी बचाव बेटी पढावो , पाणलोट क्षेत्र विकास फलोत्पादन, एड्स जनजागृती, इत्यादी विषयावर तज्ञांचे व्याख्याने झाली .

३ फेब्रुवारी २३ रोजी या शिबिराचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मा. पी.बी.पटेल ,उज्जनबाई अहिरे .मा.सुदाम नथू भलकार,मा. सुनील बुधा धनगर रावसाहेब कदम, युवराज भलकार , ज्ञानेश्वर भलकार ,संजय जाधव, इत्यादी समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले होते, या प्रसंगी स्वयंसेवकांनी आलेल्या सात दिवसांमध्ये जो अनुभव आला तो मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केला यामध्ये पारधी नंदिनी,मन्यार नर्गिस,भावना चौधरी,आरती बोरसे,अजय सोळंखी इत्यादी स्वयंसेवकांनी सात दिवसांमध्ये आलेल्या हृदयस्पर्शी अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष .पी.बी.पटेल यांनी स्वयंसेवकांना आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता येणाऱ्या समस्यांना तोंड द्यायचे आणि यामधून यशस्वी कसे व्हायचे याविषयी मार्गदर्शन केले, नवीन पिढी जास्तीत जास्त मोबाईलच्या आहारी कशी जात आहे व मोबाईल चे दुष्परिणाम कसे होत आहेत यातून बाहेर पडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले.तसेच सुदाम नथू भलकार यांनी विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी जास्तीत जास्त परिश्रम घेणे,मेहनत, जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा, आपल्या अंगी बाळगणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी आदर्श स्वयंसेकासमोर मांडला.

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. याकाळात विद्यार्थ्यांना अल्पोपहार गावातील दानशूर व्यक्तींनी दिला त्यात सुनील बुधा धनगर,संजय वामन जाधव,विजय नारायण सोनवणे.प्रतापसिंग झिंगा गिरासे,युवराज मुरार जाधव.रावसाहेब भगवान कदम इत्यादीचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी.एन.गिरासे यांनी केले. आणि कार्यक्रमाचे प्रस्तावीक व सातदिवसाचा लेखाजोखा सहाय्यक कार्यक्रम आधिकारी डॉ. वाय.सी.गावीत यांनी मांडला. तर आभार प्रगटन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सी.एस.करंके यांनी मानले.

विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप करताना या प्रसंगी ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मा. पी.बी.पटेल ,उपसरपंच उज्जनबाई अहिरे , मा.सुदाम भलकार, सुनिल धनगर,संजय जाधव युवराज भलकार, संजय जाधव, रावसाहेब कदम, ज्ञानेश्वर भलकार, महेंद्र खोंडे, रावसाहेब चव्हाण, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी जि.प.मराठी शाळा शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

Related posts

दिल्ली : देशातील पहिली व्हर्च्युअल शाळा सुरू, कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

BM Marathi

नुतन विद्यालय भटाणेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयातील चंद्रकांत साळुंखे या विद्यार्थ्यास सुवर्णपदक प्राप्त

BM Marathi

Leave a Comment