11.3 C
New York
Thursday, Nov 21, 2024
Bharat Mirror Marathi
शिक्षा

बामखेडा महाविद्यालयास केंद्र शासनाचे पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर

नंदुरबार, ग्राम विकास संस्थेचे कला महाविद्यालय बामखेडा त.त. तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार या महाविद्यालयास केंद्रशासनाच्या पीएम उषा या योजनेअंतर्गत एकूण रुपये पाच कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.सदर अनुदान ‘पीएम उषा’ या योजनेतील कंपोनंट तीन: ग्रँड्स टु स्ट्रेंडन्टस कॉलेजेस यांतर्गत प्राप्त झाले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुलक्षूण शिक्षण संस्थांना सज्ज करण्याच्या हेतूने विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा आयोग दिल्ली (रुसा)यांच्या वतीने देशपातळीवर पीएम उषा ही योजना अमलात आली. या योजनेअंतर्गत देशभरातील महाविद्यालयांमधून प्रस्ताव मागविण्यात आले होते.

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ग्राम विकास संस्थेच्या कला महाविद्यालयातील माजी प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. डॉ. वाय. आर. पाटील (समन्वयक)आणि  आर.बी. चौधरी यांच्या संयोजनाखाली सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर वर्ग यांच्या सामूहिक प्रयत्नातून परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला.

सदर प्रस्ताव तयार करत असताना संस्थेचे अध्यक्ष  पी. बी.पटेल ,उपाध्यक्ष डॉ.के. एच. चौधरी, संस्थेचे सचिव श्री बी. व्ही. चौधरी यांनी सदर प्रस्तावाला प्रेरणा दिली. वेळोवेळी त्यांनीही मार्गदर्शन केले व परिपूर्ण प्रस्ताव तयार करून शासनाला पाठविण्यात आला.प्रस्तावाचे अत्यंत काटेकोरपणे शासनाच्या वतीने मूल्यांकन होऊन महाविद्यालयास विकासासाठी एकूण पाच कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे.

सदर अनुदानातून सायन्स /आयसीटी बिल्डिंग, लायब्ररी बिल्डिंग आणि सेमिनार यांचे नूतनीकरण व अपग्रेडेशन ,सायन्सचे विविध इन्स्ट्रुमेंट्स,डिजिटल बोर्डस्, व्हरच्यूअल क्लासरूमची निर्मिती, एलसीडी प्रोजेक्टर्स, कॉम्प्युटर लॅब, सोलर सिस्टिम, इत्यादी अनेक इक्विपमेंट्स खरेदीसाठी तसेच सॉफ्ट कंपोनंट ऍक्टिव्हिटीज अंतर्गत ब्रिज कोर्सेस, रेमेडियल कोचिंग, सर्टिफिकेट कोर्सेस, ऍग्रीकल्चर रिलेटेड व्होकेशनल कोर्सेस, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोजेक्ट, टीचर्स ट्रेनिंग, इत्यादी विविध बाबींसाठी सदर अनुदान उपयोगात आणले जाईल, या अनुदानामुळे महाविद्यालयाच्या एकूणच चेहरा मोहरा बदलण्यात येईल.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण प्राप्त होण्याच्या दृष्टीने संस्थेने केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून विशेषतः सायन्स आणि आयसीटीचे दर्जेदार शिक्षण परिसरातील अनेक मुला-मुलींना विनासायास व प्राप्त होऊ शकेल या दृष्टीने सदर अनुदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

नंदुरबार जिल्ह्यातून प्रस्तुत अनुदान मंजूर होणारे कला महाविद्यालय बामखेडा त.त. तालुका शहादा हे एकमेव महाविद्यालय आहे. ग्रामीण भागातील आदिवासी परिसरातील शेतकरी, शेतमजूर तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण प्राप्त होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून मंजूर झालेल्या अनुदानाबद्दल परिसरामध्ये आनंद व्यक्त होत आहे. संस्था व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य, सर्व प्राध्यापक,प्राध्यापकेतर वर्ग यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Related posts

बामखेडा महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिर त-हाडी येथे संपन्न

BM Marathi

व्यावहारिक जिवनात सांगड घालणारे व्यासपीठ म्हणजे एन एस एस शिबिर – प्रा. अशोक गिरासे

BM Marathi

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मीरा भाईंदर येथे सायकल रॅली

BM Marathi

Leave a Comment