नंदुरबार: साईबाबा भक्त मंडळ संचालित ,कला वरिष्ठ महाविद्यालय, म्हसावद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक गांव लक्कडकोट येथे श्रमसंस्कार शिबिराचे 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. श्रमसंस्कार शिबिराचा समारोप दिनांक 18 फेब्रुवारी वार रविवार रोजी संपन्न झाला.
क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या परिपत्रकानुसार “सक्षम युवा समर्थ भारत” हे ब्रीदवाक्य विशेष हिवाळी शिबिराचे होते. श्रम संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लक्कडकोटचे सरपंच जालमदादा जंगा पावरा, उपसरपंच वसंताबाई सुरेश पवार, ग्रा. सदस्य सागर जाधव, पोलीस पाटील सखाराम शंकर पावरा हे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच जालमसिंग पावरा म्हणाले की, श्रमसंस्कार शिबिर जीवन कौशल्य शिकविते. जीवन जगण्याची प्रेरणा शिकविते. विद्यार्थ्यांनी त्यातून बोध घेऊन भविष्यात जबाबदार नागरिक बनले पाहिजे. एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक गिरासे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून शैक्षणिक व व्यावहारिक जीवनाचे सांगड घालण्याचे व्यासपीठ उपलब्ध होत असते. सात दिवशीय शिबिरात विद्यार्थ्यांना श्रमदानातून गावाच्या विकासाची प्रेरणा मिळत असते. सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. संगीता पटेल यांनी या शिबिरातून समाजामध्ये एकरूप होण्याची प्रेरणा व जबाबदार नागरिक होण्याचा अनुभव येतो. निस्वार्थ कार्याची भावना श्रमदानातून समजते असे संबोधले.
प्रा.श्रीराम बनसोडे यांनी विद्यार्थी जीवन आणि व्यक्तिमत्व विकास याचा समन्वय घालण्याचे उत्तम व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर होय. सहा. प्रा. ज्ञानेश्वर गवळे म्हणाले की, श्रमसंस्कार शिबिरातून समाजाभिमुख दृष्टिकोन वृद्धिंगत होऊन सुज्ञ नागरिक घडविण्यासाठी प्रेरणा मिळते. विविध मार्गदर्शक समाजातील विविध घटकांमध्ये वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करून आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात आपले राष्ट्रपुरुषांनी प्रेरणा देशाविषयी स्वाभिमान, समाजाविषयी आपुलकी, सामूहिक श्रमदानाचे महत्त्व यामधून एकतेची भावना वृद्धिंगत होते. सहा.प्रा. गणेश पवार यांनी श्रमदानातून गावाचे विकासाचा आधार या विषयी माहिती दिली. प्रा.कैलास लव्हाळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व याविषयी माहिती दिली.
एनएसएस शिबीरार्थी सचिन पावरा आपल्या मनोगतात म्हणाला की, सात दिवसाच्या शिबिरामध्ये जबाबदार नागरिकांची भावना समजली. या अनुभवाची शिदोरी सदैव जीवनामध्ये मार्गदर्शक ठरेल. शिबिरार्थी विद्या पवार म्हणाली की शिबिराच्या माध्यमातून गावातील लोकांशी समरस होता आले. शिस्त आणि राष्ट्रप्रेम याविषयी माहिती मिळाली. योगिता चव्हाण, अंजली निकुंभे,मनोज पावरा, भावना गिरासे, नितीन पावरा. अर्जुन पावरा आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य मनोज पाटील ,एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी अशोक गिरासे सहा.कार्यक्रम अधिकारी, प्रा संगीता पटेल, अर्थशास्त्र विभागाचे प्रा.श्रीराम बनसोडे, प्रा. कैलास लव्हाळे सहा.प्रा. ज्ञानेश्वर गवळे, सहा प्रा. कविता भिलावे, सहा प्रा. गणेश पवार, कर्मचारी हेमराज पाटील अविनाश पाटील, गणेश पाटील , जितेंद्र पाडवी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब विठ्ठल हिरजी चौधरी आणि संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासो धारुभाई सदाशिव पाटील, सचिव आप्पासो गणेश नरोत्तम पाटील, तसेच संस्थेचे संचालक प्रसन्नकुमार सुभाष बंब , नत्थू लिमजी पाटील ,माधव शंकर पाटील धनालाल ओंकार सूर्यवंशी आदी संचालक मंडळाने कौतुक केले.