नंदुरबार: श्री साईबाबा भक्त मंडळ संचालित ,कला वरिष्ठ महाविद्यालय म्हसावद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक गांव लक्कडकोट येथे श्रमसंस्कार शिबिराचे 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात येतआहे.क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या परिपत्रकानुसार “सक्षम युवा समर्थ भारत”हे ब्रीदवाक्य विशेष हिवाळी घेतले जात आहे.
श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक अब्बास यासीन भिल लक्कडकोट यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब विठ्ठल हिरजी चौधरी आणि “प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासो धारुभाई सदाशिव पाटील, सचिव आप्पासो गणेश नरोत्तम पाटील, तसेच लक्कडकोटचे सरपंच जालम जंगम पावरा उपसरपंच वसंताबाई सुरेश पवार संस्थेचे संचालक प्रसन्नकुमार सुभाष बंब, नत्थू लिमजी पाटील, माधव शंकर पाटील, धनालाल ओंकार सूर्यवंशी, पोलीस पाटील सकाराम शंकर पावरा
उपस्थित होते.
दुपारच्या बौद्धिक सत्रात पाणी फौंडेशनच्या गुणवंत पाटील आणि श्रमसंस्कार शिबिर होत आहे.सात दिवसिय श्रमसंस्कार शिबिरात पाणी व्यवस्थापन, शिक्षण व समाज, स्त्री सक्षमीकरण, शाश्वत विकासात युवकांचे योगदान, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाची काळजी, स्वछ भारत मिशन मोहीम,इंडिया मधुन भारत तयार करणे.शाश्वत विकासासाठी अंधश्रद्धा निर्मूलन, अंधश्रद्धा ग्रामीण विकासातील अडसर इ. विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच व्यक्तिमत्व विकास या विषयावर तर आणि यांचे मानवी हक्क व कायदा याविषयावर मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य मनोज पाटील ,एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी अशोक गिरासे सहा.कार्यक्रम अधिकारी,प्रा संगीता पटेल अर्थशास्त्र विभागाचे प्रा.श्रीराम बनसोडे, प्रा. कैलास लव्हाळे सहा.प्रा. ज्ञानेश्वर गवळे सहा प्रा. कविता भिलावे सहा प्रा. गणेश पवार,कर्मचारी हेमराज पाटील अविनाश पाटील गणेश पाटील , जितेंद्र पाडवी यांनी परिश्रम घेतले.