बामखेडा येथील ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयात आदिवासी जनसेवक व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती संपन्न झाली. सदर कार्यक्रम महाविद्यालयातील स्टाफ अकॅडमी, एन.एस.एस. विभाग, विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र शहादा शाखेचे शाखा अधिकारी सन्माननीय शशिकांत गायकवाड, उपशाखा प्रबंधक शिवम् नामदेव व धुळे येथील नंदुरबार आणि जिल्हा धुळे जिल्हा रिलेशनशिप मॅनेजर देवेंद्र देवरे हे उपस्थित होते.
याप्रसंगी बिरसा मुंडा जयंती व महाबँक योजना उद्बोधन हे दोन्ही कार्यक्रम एकत्रपणे संपन्न झाले.प्रमुख अतिथी श्रीमान शशिकांत गायकवाड यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकून बिरसा मुंडा यांचे कार्य केवळ आदिवासी समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण मानव जातीसाठी प्रेरक आहे असे मौलिक विचार मांडले. सर्वप्रथम मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर सर्व अतिथींच्या यथोचित सन्मान करण्यात आला.
श्रीमान शशिकांत गायकवाड व शिवम् नामदेव यांनी सर्व उपस्थितांना डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत घ्यावयाची खबरदारी याचे मार्गदर्शन केले.ऑनलाइन व्यवहार,ग्राहक म्हणून बँकेशी संबंध ,बँकेच्या विविध योजना यावर उद्बोधन केले.
रिलेशनशिप मॅनेजर देवेंद्र देवरे यांनी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील होते. प्रा.एम.एस.निकुंभे यांनी सूत्रसंचालन केले व डॉ. वाय. आर. पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.