11.3 C
New York
Thursday, Nov 21, 2024
Bharat Mirror Marathi
महाराष्ट्र शिक्षा

आयर्लंड सरकारने आयरिश संस्‍थांना आणले एकत्र; मुंबईमध्‍ये वैयक्तिक एज्‍युकेशन फेअरचा शुभारंभ

एज्‍युकेशन इन आयर्लंड नोव्‍हेंबरमध्‍ये मुंबई व शहरांमध्‍ये त्‍यांच्‍या वैयक्तिक एज्‍युकेशन फेअरसाठी भारतात १६ आयरिश एचईआयना एकत्र आणणार

मुंबई, 16 नोव्‍हेंबर २०२२: भारतीय विद्यार्थ्यांनी विचारलेल्‍या व्‍यापक प्रश्‍नांमधून प्रेरित होऊन एज्‍युकेशन इन आयर्लंड हा ‘आयरिश उच्च शिक्षण संस्थांना प्रोत्साहन देणारा आयरिश सरकारचा राष्ट्रीय ब्रॅण्‍ड’ पुण्यात साथीच्या रोगानंतर पहिल्‍यांदाच वैयक्तिक एज्‍युकेशन फेअर आयोजित करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑन-ग्राउंड फेअरचे रिलॉन्‍च त्याच्या उपस्थितांसाठी भरपूर संधींसह येते आणि २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षासाठी परदेशात शिक्षण घेण्यास उत्सुक असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देईल.

२३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील सेंट रेगिस येथे दुपारी १ ते सायंकाळी ६ या वेळेत हा फेअर आयोजित केला जाईल, ज्यामध्ये एजंट नियुक्त करण्याच्या त्रासाशिवाय १६ आघाडीचे आयरिश एचईआय संबोधित करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी, उपलब्ध कार्यक्रम, सेवन, ऑफर स्वीकृती, कॅम्पस् लाइफ, निवास, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समर्थन, शिष्यवृत्ती, संस्कृती याविषयी चर्चा करण्‍यासाठी एका छताखाली उपस्थित राहतील. मुंबई व्यतिरिक्त या महिन्यात नवी दिल्ली आणि पुणे येथे एज्‍युकेशन इन आयर्लंड फेअर्स आयोजित करण्यात आले होते आणि २६ नोव्‍हेबरला चेन्नई व २७ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे आयोजित केले जातील.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे देशात स्वागत करण्यात आयर्लंड आघाडीवर आहे. हे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रस्थापित करिअरची हमी देते आणि इतर कोणत्याही परदेशातील शिक्षण गंतव्यस्थानाप्रमाणे भारतीय विद्यार्थ्यांना अधिक आरओआय ऑफर करते. या फेअर्सबाबत बोलताना एज्‍युकेशन इन आयर्लंडसाठी भारत व दक्षिण आशियामधील प्रादेशिक व्‍यवस्‍थापक श्री. बॅरी ओ’ड्रिस्‍कोल म्हणाले, “वैयक्तिक एज्‍युकेशन फेअर्स दोन वर्षांच्या अंतरानंतर होत आहेत आणि आम्ही विविध ठिकाणी फेअर्स पुन्हा सुरू करत आहोत. भारतातील शहरांमध्ये आयरिश उच्च शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींशी समोरासमोर आणि थेट संवाद साधून विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासक्रम व नोकरी शोधण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. या फेअर्समुळे विद्यार्थ्यांना सर्व संधी आणि आयर्लंडने देऊ केलेल्या शक्यतांची माहिती मिळण्यास मदत होईल.’’

अलिकडच्या वर्षांत आयर्लंडमध्ये मेकॅनिकल इंजीनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजीनिअरिंग, बायोटेक्‍नोलॉजी, क्लाउड कम्‍प्‍युटिंग, आर्टिफिशियलइंटेलिजन्‍स, डेटा अॅनालिटिक्‍स, सायबर सुरक्षा, अकाउंटिंग/फायनान्स आणि एमबीए यांसारख्या अभ्यासक्रमांसह ऑफबीट अभ्यासक्रमांच्या मागणीत वाढ होत आहे.

श्री. ओ’ड्रिस्‍कोल पुढे म्‍हणाले, “आम्ही आयर्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांची वाढलेली आवड आणि एचईआयच्या ऑफरमधील अभ्यासक्रम पाहिले आहेत. ५००० हून अधिक भारतीय विद्यार्थी परदेशात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील शिक्षणासाठी आयर्लंडला गंतव्‍य म्हणून निवडतात. आयर्लंडमध्ये शिक्षण घेण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थी पदव्युत्तर स्तरावर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांपर्यंत ‘स्टे-बॅक’ पर्यायांचा लाभ घेऊ शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना डायनॅमिक क्षेत्रात रोजगार मिळवण्यासाठी आयर्लंडमध्ये एक वर्ष राहण्याची संधी मिळते.”

आयरिश एज्युकेशन सिस्टिमची जगभरातील टॉप १० मध्ये स्थान मिळवण्यासाठीची सुसंगतता सर्वसमावेशक करिअरसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयर्लंडला गो-टू गंतव्‍य बनवते. आयर्लंड सर्वात स्थिर, सुरक्षित व व्यवसाय-समर्थक अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, ज्यामुळे करिअरची वाढ आणि उत्तम राहणीमान शोधत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण संयोजन आहे.
हे फेअर्स सर्व विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी, त्यांच्या क्षमतांचे मापन करण्यासाठी, खाली नमूद केलेल्या आघाडीच्या आयरिश संस्थेकडे थेट अर्ज करण्यासाठी आणि अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, नोकरीच्या संधी, कॅम्पस् भरती, शिष्यवृत्ती, प्रवेश यांविषयी प्रथम माहिती प्राप्त करण्यासाठी विनामूल्य व्यासपीठ प्रदान करतील.

सहभागी होणाऱ्या एचईआयची यादी

अटलांटिक टेक्‍नोलॉजिकल युनिव्‍हर्सिटी  –  युनिव्‍हर्सिटी ऑफ गॅलवे
डब्लिन बिझनेस स्कूल  – साऊथ ईस्‍ट टेक्‍नोलॉजिकल युनिव्‍हर्सिटी
डब्लिन सिटी युनिव्हर्सिटी – टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी डब्लिन
डंडल्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी – टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी ऑफ शॅनन मिडलँड्स, मिडवेस्ट
ग्रिफिथ कॉलेज – ट्रिनिटी कॉलेज डब्लिन
मायनूथ युनिव्हर्सिटी – युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्क
मुन्स्टर टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी – युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन
नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंड – युनिव्हर्सिटी ऑफ लिमेरिक

परदेशात, विशेषत: आयर्लंडमध्ये शिक्षण घेण्याची आणि अधिकृत आयरिश सरकारच्या प्रतिनिधींकडून सल्ला/सल्ले मिळण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एज्‍युकेशन फेअरला उपस्थित राहणे ही सर्वोत्तम संधी आहे. व्हिसा प्रक्रियेपासून निवास व शिक्षण अभ्यासक्रमापर्यंतच्या परदेशातील अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्याबद्दल जाणून घेण्यासाठी आणि उपस्थित अधिकाऱ्यांशी वन-टू-वन संवाद साधून शंका दूर करण्यासाठी हे एक परिपूर्ण मार्गदर्शक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: https://bit.ly/PREINOV

Related posts

तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराची सुरवात

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न

BM Marathi

मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर, सचिवपदी रमेश प्रभू यांची नियुक्ती

BM Marathi

Leave a Comment