मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील फेअरफिल्ड मॅरियट हॉटेल येथे महानगरातील प्रतिष्ठित सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था एम्मपल मिशनने आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात भारत आणि अमेरिका यांच्यातील सांस्कृतिक संवर्धनासाठी प्रतिष्ठित भारत-अमेरिका कल्चरल प्रमोशन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराच्या प्रमुख प्राप्तकर्त्यांमध्ये पार्श्वगायिका शिवानी कश्यप, मनारा चोपडा, विपिन अनेजा, दीपिका शर्मा, प्रभाकर शुक्ला, जिनल पंड्या, मुकेश ऋषी विंदू दारा सिंग गुरप्रीत कौर चड्ढा राजेश पुरी जश्न अग्निहोत्री मिलिंद श्रीवास्तव सुरेंद्र पाल सिंह, मोंटी शर्मा, सुधांशू पांडे, अभिमन्यु दस्सानी, तनिशा मुखर्जी, उदित गौर वंदना सजनानी, राजू मनमानी, अमित बे खी बॉलीवूड अभिनेत्री प्रीती जिघानिया प्रवीण डबास कॉमेडियन बीआईपी मनाली जगताप कनिशा अवस्थी बसंत रासिवसिया याचा समावेश आहे.
शेवटी कार्यक्रमाचे आयोजक एम्मपल मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अनिल काशी मुरारका यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमरन आहुजा यांनी केले.