Bharat Mirror Marathi
सुरत

उधन्यात तरुणाचा तर भेस्तानात महिलेचा वाहन अपघातात मृत्यू

सुरत ( प्रतिनिधी ) शहरातील उधना व भेस्तान परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात उधना येथील एका तरुणाचा तर भेस्तान येथील महिलेला आपला जीव गमवावा लागला असून दुचाकीच्या धडकेत तरुणाचा तर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे.

उधना पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उधना येथील विनायक नगर येथे राहणारे महेंद्र राजू पाटील (वय 33) हे रात्री 10 वाजता उधना अरिहंत कॉम्प्लेक्ससमोर दक्षेश्वरकडून येत असताना रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात दुचाकी स्वारने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झाला आणि आज पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.दुसऱ्या घटनेत सिल्व्हर पार्क, भेस्तान येथे राहणाऱ्या मुमताजबेन शैलेश दरेडिया (वय 54) यांचा काल संध्याकाळी सुरत-नवसारी मेन रोडवरील रॉयल एव्हेन्यू समोरून जात जात होते.त्यावेळी त्यांना अज्ञात वाहन चालकाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.या दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related posts

उधना येथील सिल्क मिलला भीषण आग, अग्निशमन अधिकारी गंभीर जखमी

BM Marathi

गुजरात : काँग्रेस उमेदवार गांधीजींच्या वेशात प्रचार करणार

BM Marathi

सुरत : 4 लाखांचा चेक रिटर्न केल्याप्रकरणी कापड व्यावसायिकाला दोन वर्षांचा कारावास

BM Marathi

Leave a Comment