15 C
New York
Thursday, Dec 12, 2024
Bharat Mirror Marathi
नंदुरबार शिक्षा

कला महाविद्यालयत राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ जयंती साजरी

ग्रामविकास संस्था संचलित कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवस व राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वाय.आर.पाटील होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ वाय.सी. गावीत यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या सामाजिक कार्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.वाय.आर.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद हे आजच्या तरुणासाठी कशा पद्धतीने आदर्श व्यक्ती होते. या संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले .

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थी विकास विभाग अधिकारी, भूगोल विभाग प्रमुख डॉ.बी.एन.गिरासे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रकटन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सी.एस.करंके यांनी केले.सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ.आर.एस.जगताप,प्रा.ए.एम.गोसावी, डॉ.के.पी.पाटील. डॉ वाय. सी. गावित,श्री आर.बी.चौधरी प्रा.रवींद्र पावरा श्री विजय चौधरी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयं सेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

बामखेडा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन सप्ताहाची सांगता

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

BM Marathi

Leave a Comment