11.3 C
New York
Thursday, Nov 21, 2024
Bharat Mirror Marathi
महाराष्ट्र

मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर, सचिवपदी रमेश प्रभू यांची नियुक्ती

मुंबई जिल्हा उपनगर कौ. ऑप. हौसिंग फेडेरेशन लिमिटेड सहकारी संस्थेच्या पदाधिकारी पदाच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी सुनील पी. राणा यांच्या अध्यासी अधिकारी याच्या उपस्थितीत संपन्न झाली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भगवा फडकला आहे. फेडरेशनच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक विनोद घोसाळकर, सचिवपदी रमेश प्रभू तर खजिनदारपदी संजय वामन भोसले यांची निवड करण्यात आली.

मुंबई जिल्हा उपनगर कौ. ऑप. हौसिंग फेडेरेशनच्या कार्यालयात संपन्न झालेल्या निवडणूक निकालानंतर शिवसैनिकांनी फटाके व गुलाल उधळत एकच जल्लोष केला. मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील सुमारे 4 हजार 235 गृहनिर्माण संस्था या फेडरेशनच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेडरेशनच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आजचा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष अभिषेक घोसाळकर यांनी सर्व सभासदांचे आभार मानत फेडरेशनच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थेच्या समस्या सोडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

गृहनिर्माण संस्था तक्रार निवार समिती वार्ड निह्यय स्थापन करून तक्रार निवारणाचे काम केले जाईल व गृहनिर्माण संस्था सभासदांच्या थकबाकीदार वसुलीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमणूक करून लिगल सेलची स्थापना करणार असुन वसुली दाखला उपनिबंधकाकडून मिळवून त्याबद्दलची अमलबजावणी केली जाईल असे उपनगर जिल्हा फेडरेशनचे सचिव रमेश प्रभू यांनी सांगितले.

यावेळी मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशनचे सर्व संचालक संजय वामन भोसले- खजिनदार, पांडुरंग नाना देसाई, अभिषेक विनोद घोसाळकर – अध्यक्ष, संदीप विश्वनाथ जाधव, जितेन चेतन परमार, सचिव- सी.ए. रमेश शंकर प्रभू, सौ. स्मिता लाछिराम चौधरी, अॅड सौ. सुनीता सुनील गोडबोले, विशाल सोपान कांबळे सौ. उषा लहू भोर, नंदकुमार हरीश्चंद्र वरणकर उपस्थित होते.

Related posts

डॉ. प्रतिक यांना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेने (UNHRO) आंतरराष्ट्रीय शांतता दूत म्हणून नियुक्त केले आहे.

BM Marathi

युगांडा एअरलाइनकडून आठवड्यातून तीनदा एण्‍टेबे ते मुंबई विमानसेवेच्‍या लाँचसह भारतातील कार्यसंचालनांचा शुभारंभ

BM Marathi

आयर्लंड सरकारने आयरिश संस्‍थांना आणले एकत्र; मुंबईमध्‍ये वैयक्तिक एज्‍युकेशन फेअरचा शुभारंभ

BM Marathi

Leave a Comment