Bharat Mirror Marathi
नंदुरबार

बामखेडा कला महाविद्यालयात मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिराचे आयोजन

शहादा, बामखेडा येथील ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयात शुक्रवार, दिनांक 14 ऑक्टोबर, 2022 रोजी परिसरातील नागरिकांसाठी मोफत मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. आयुष विभाग दिल्ली प्रायोजित आयुष संचालनालय मुंबई व कर्मवीर व्यं.ता. रणधीर आयुर्वेद महाविद्यालय, बोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन होत आहे.

परिसरातील नागरिकांमध्ये मधुमेह रोगाच्या बाबतीत जाणीव जागृती होऊन सदर रोगाच्या संदर्भात प्रतिबंध व्हावा या हेतूने सदर शिबिरात मोफत पणे राबविण्यात येत आहे. शिबिरात उपाशी पोटी व जेवणानंतर दोन तासांची शरीरातील साखरेची पातळी तसेच मागील तीन महिन्यातील सरासरी साखरेची पातळी (एचबीएवनसी) मोफतपणे तपासली जाऊन आवश्यकतेनुसार उपचारही केले जाणार आहेत.

शिबिरासाठी आयुर्वेद महाविद्यालय बोराडी येथील डॉ. नरेंद्र मुंढे, डॉ. राजेश गिरी, डॉ. गणेश कोल्हे व डॉ. संदीप बिरारी यांचे मार्फत तपासणी होऊन उपचार केले जाणार आहेत. शिबिराला येताना उपाशीपोटी यावे. शिबिराची वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन अशी असेल. शिबिराचे ठिकाण कला महाविद्यालय बामखेडा हे राहील.

मधुमेहाचे प्रारंभिक अवस्थेत निदान झाल्यास व त्यावर वेळीच योग्य उपचार केल्यास पुढे मधुमेह व भविष्यातील गंभीर परिणाम टाळता येतात म्हणून सदर मोफत शिबिरास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, एन.एस.एस. विभागाचे प्रमुख डॉ.सी.एस.करंके यांनी केले आहे.

Related posts

बामखेडा महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिर त-हाडी येथे संपन्न

BM Marathi

लक्कडकोट तालुका शहादा येथे राष्ट्रीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन दिमाखात संपन्न

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रम संपन्न

BM Marathi

Leave a Comment